Monday 8 February 2016

Intuitive Intelligence


Intuitive Intelligence’ हे पुस्तक आध्यात्मिक साधनेतून स्वतःचे तत्त्वज्ञान निर्माण करणार्‍या दादाजी (श्री दत्ताराम माधवराव गावंड, ठाणे) यांचे आहे. या पुस्तकात डाव्या पानावर छायाचित्र आहे आणि उजव्या पानावर त्या छायाचित्रावर इंग्रजीतून केलेले तात्त्विक भाष्य आहे. To be is to be intelligent... हे त्यांच्या तत्त्वज्ञानाचे सार आहे असे म्हणता येईल. या काव्यात्म भाष्याचे रुबाई या आकृतीबंधात रूपांतर करण्याचा प्रयत्न मी केला आहे. ‘Intuitive Intelligence’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादात यातील काहींचा समावेश दादाजी यांनी केलेला आहे.
*



Intuitive Intelligence : By Dadaji
मराठी रूपांतर : आसावरी काकडे

To the Cosmic Intelligence

Who are you ?
Who have found your way
To the Centre of my life
To the core of my being
Yet your face is unfamiliar
Who are you ?
Who can soothe me so gently
Disturb me so completely
Show me so clearly and strongly
Hidden, guarded aspects
Of my personality
Who are you ?
My most intimate friend
Most remote shining star
Twinkling and always changing
Yet remaining silent and constant
Who are you ?
Who leaves me
Ever less knowing

हृदयात पोचतो मार्ग तुझा तू कोण ?
आस्तित्व वेढुनी राहतोस तू कोण ?
तू असा भोवतीजाणिवेत भरलेला
चेहरा तरीही अज्ञातच उरलेला !

हलकेच उठविसी रोमांच शरीरावरती
हलवून सोडसी देहामधली माती
उलगडुन दाविसी व्यक्तित्वाचे रंग
अन अथांगतेच्या सीमेवरती थांग

तू कोण असा जीवीचा जिवलग मित्र
दूरात चमकते तेजस्वी नक्षत्र
ते चमचमणारे नित्य नविनसे रूप
राहते तरीही शांत अचल अन स्थीर

तू कोणकोण तूमाझ्यातच असणारा
अन तरी मलाही मुळीच ना कळणारा ?
***

In every fruit hides a tree
In mortal man eternity
Hide and seek is a game divine
A play of Timeless in time

लपलेला असतो वृक्ष जसा बीजात
हे चिरंतनत्वहि तसे मर्त्य देहात
हा लपंडाव रे असे ईश्वरी खेळ
चैतन्य आणखी जड मातीचा मेळ !
***

That which blocks the light of the Cosmic Sky
The transparent immaculate heart with fears and hopes
Angers and greeds, with a jungle of
Complex desires and dreams, is your Mind!

हे कसले जंगल ? की वेडे मन आहे
जे ब्रम्हांडाचे तेज झाकते आहे
जणु विकार सारे इच्छा लडबडलेल्या
ग्रासती निरामय निष्कलंक हृदयाला
***

Senses are deceptive
Mind is illusive
The daily world of vision
Is a subtle deception

फसवीच इंद्रिये मनही फसवे असते
हे दृश्य विश्वही अगम्य, फसवे असते !
***

Like the roots of a tree
Mind likes to hold on to its structure
Firmly, attachment and continuity in time
Are the sole objectives of Mind!

अदृश्यपणे तोलती मुळे वृक्षाला
तोलते तसे मन आपुल्या व्यक्तित्वाला
गुंतते, स्मरण ठेवते, स्वप्न पाहते
रोवून मुळेही कालनिबद्ध राहते !
***

To turn back and enter within
To explore the hidden corners of
One’s own personality is a rewarding journey
Balance, peace and fulfillment are the
Results of inner pilgrimage !

फिरवून पाठ जायचे स्वत:च्या आत
अन शोधायाचे लपलेले व्यक्तित्व
फलदायी असते अशी आतली यात्रा
ओंजळीत देते स्थैर्य, शांति, सार्थकता !
***

Only in freedom from all bondage
Influence and conditioning
Life energy finds intuitively
Its own flowering and fulfillment.

नसतात बंधने, असते केवळ मुक्ती
वाहते नसांतुन तेव्हा सर्जक शक्ती
फुलण्याला मिळते सहजस्फूर्तशी दिशा
पूर्तता लाभुनी फळते मनची आशा
***

Life and tide
Move in the present
A cosmic dance
In micromoment!

क्षणकाल विलसते जीवन तळहातावर
क्षणकाल चमकती लाटा अथांगतेवर
सर्वत्र चालतो क्षणिक खेळ विश्वाचा
सर्वत्र चालतो उत्सव ‘याच’ क्षणाचा !
***

When tongue is let loose
Intelligence goes to sleep
In attentive alert state
Gossipy mind has no place

चैतन्य आतले शब्दातुन ओघळते
ज्ञानाला तेव्हा नकळत ग्लानी येते
जाग्रुतीत असते सदैव सावध चित्त
अस्थीर मनाला नसते जागा त्यात
***

Conflict
Confusion
And chaos
Fragment and dissipate
Life energy

विस्कटते जीवन संघर्षाने जेव्हा
शतखंडित होते जीवनशक्ती तेव्हा
संभ्रमात नुरतो विवेक, बुद्धी भ्रमते
जगणेही साधे अशक्य होउन जाते !
***

Unity, Integrity and Harmony
Generate constructive and creative flow
Of life energy.

हा मिलाफ सुंदर असे ऐक्य अन् मेळ
साधता, रंगतो हा जगण्याचा खेळ
झुळझुळू लागते अथांग सर्जक शक्ती
सृजनाचा उत्सव असा रंगतो भवती.
***

Man can easily fly
Higher and higher in the sky
Lo ! how difficult it is
To rise above himself.

पाखरांहूनही उंच उंच आकाशी
तू असा कुठेही सहजी पोचू शकसी
पण महाकठिण रे स्वत:मधुनी उठणे
देहातच रुतले पाश सोडवुन घेणे
***

Many a times the intuitive wisdom
Has been denied and destroyed by the greedy
And erudite knowledgeables.

जन्मल्या प्रार्थना, सहजस्फूर्तसे ज्ञान
नाकारुन त्यानी केले ते निष्प्राण
वाचून ग्रंथ जे केवळ पंडित झाले
आतून उगवणे त्याना नाही कळले !
***

Every morning is a new day
A fresh ray of hope to humanity
It’s a moment in timeless eternity
A spark of omnipresent reality

ही पहाट करते स्वागत नव दिवसाचे
ही पहाट देते स्वप्न नव्या आशेचे
तो काल चिरंतन हा क्षण त्याच्यामधला
जे सर्वव्यापि हा बिंदू त्याच्यामधला
***

In search of freedom and happiness
Man invents excitements and escapes
Are freedom and happiness
Cultivated attitudes Of mind ?
Or are they the outcome of internal being
Unrelated to mind ?

शोधात सुखाच्या अन्‍ मुक्तीच्या जाशी
नाकारुन सारे उन्मादातच फसशी
रे सुख असे का मनोरंजनी मिळते ?
ते मनापलिकडिल आस्तित्वातुन फुलते !
***

Life energy flows freely like a fountain
Spontaneously and creatively –
When left unhindered by thought-dominated Mind.

जे शोषुन घेते शक्ती कणाकणाने
त्या मनास जिंकुन घ्यावे प्राणपणाने
मग, मुक्त उसळते पाणी कारंजातुन
उसळेल तशी रे सर्जक शक्ती आतुन !
***

Even the tiny ants have complete know-how
To build a beautiful fortress for safe dwelling
 Where did they learn this skill
Of masonry and architectural designing ?

मुंग्याना इवल्या सारे माहित असते
बांधावे वारुळ कसे सुरक्षित, कळते
स्थापत्यकला ही कुणी शिकविली त्याना ?
की ज्ञानाहुनही श्रेष्ठ सहजप्रेरणा ?
***

Human emotional love
So tender and touching
Is but a trap of time
To perpetuate the human species
A golden chain in disguise.

वात्सल्यभावना किती निरागस दिसते
पण लोभस ते ‘नियती’चे जाळे असते
हा जीवसृष्टिचा खेळ अखंड रहावा
हा मायापाशही त्यासाठीच असावा !
***

Let each one offer
The best that he can
Like thorny cactus plant
Presents sweet fruits to man.

हा निसर्ग देतो प्रत्येकाला काही
ना कधीच असते रिक्तहस्त कोणीही
निवडुंगही देतो गोड फळे मनुजाला
त्यानेही द्यावे जमेल ते दुसर्‍याला !
***

The complex structure of the human mind
With all its thoughts and emotions,
Is like a stalactite cave.
Both are as hard as rock, hidden inside
And have taken centuries of time
For their formation.

ही नव्हे गुहा बघ हे तर चित्र मनाचे
हे खडक लोंबते मनातील गुंत्यांचे
ही अगम्य रचना मनासारखी गूढ
शतवर्षांची ही तरि न जाणती मूढ
***

Self-centered and rigid
By nature he is proud
His image of himself
Is higher than a cloud
Thy name is ego !

ओळखू न शकते स्व-रुप सुद्धा कोणी
पण ठामपणे मानती स्वत:ला ‘कोणी’
पोसती ‘अहं’ला मानुन शाश्वत सारे
मग अहं म्हणे मी खुडून आणिन तारे !
***

Life is a long long walk
A journey in the cosmic twilight
A movement of the
Beginingless towards the endless.

कोठून निघालो कुठे जायचे आहे ?
हा उजेड तोवर प्रवास चालू राहे
हा विश्वपसारा यास आदि ना अंत
रे जीवन म्हणजे चालायाचे फक्त !
***

Instinct of fear and self-preservation
Has left the legacy of being self-centered
And thus self-conscious all the time
Now they have become a barrier
For experiencing one’s own inner being

मृत्यूची भीती अखंड सावध करते
वृत्तीत त्यामुळे आत्मकेंद्रिपण येते
ते रोखुन धरते जगणे देहापुरते
त्या पल्याड जगणे अनुभवता ना येते.
***

With rain, river, sun and wind
Nature is at work with its own design
Oceans of the past have been turned into Mountains.
And mighty Civilizations into dust.

दर क्षणी चालते नर्तन सृष्टीमध्ये
परिवर्तन होते अखंड, रचनेमध्ये
हा पर्वत होता, अथांग सागर काल
कालची संस्कृती ती ही इथली धूळ !
***

From darkness of accumulated knowledge
Move into the light of attentive awareness
To enter the realm of the intuitive Unknown
Where life and truth blend together

ग्रंथात गोठल्या तिमिरातुन ज्ञानाच्या
जायचे प्रकाशाकडे सजग प्रज्ञेच्या
साम्राज्य तिथे सहजानुभूत गुढाचे
जीवनास भिडते सत्य तिथे सृष्टीचे
***

Meditation is intense attentive inwardness
A play of the entire life energy in the Present
 It’s a tranquil, total, blissful state.

अंतरात रमते ती ही ध्यानावस्था
संपूर्ण शक्तिचा मेळच ध्यानावस्था
‘या’ क्षणात जगते पूर्णपणे ही स्थिती
ही शांत निरामय सौख्याची परिमिती !
***

Life unfolds in the womb of earth
The alchemy of nature – a mystical force
Turning crystals and diamonds from
Earthly dust.

गर्भात पृथ्विच्या अगम्य शक्ती असते
ती गूढपणाने अखंड किमया करते
स्फटिकासम पाचू, हिरे जणू की तारे
मातीत जन्मते मौल्यवान ते सारे.
***

Psychological memories of past
Are like reflections on water,
merely shadows of Reality.
They are unread and illusive
Though attractive, are deceptive.

जे घडून गेले पुन्हा पुन्हा ते स्मरती
त्या आठवणी तर प्रतिबिंबासम असती
सावल्याच केवळ त्याना शरीर नसते
जरि आकर्षक ते सारे फसवे असते.
***

Translucent colors of the sunset beauty
With celestial colors you celebrate the joy
I found you in the bush on the road-side
But you are the bird of paradise.

संध्येचे सुंदर लाल रंग लेऊन
आनंद उधळसी स्वत:मधे रंगून
गवसलास मज तू वाटेवर झुडुपात
रे स्थान तुझे पण स्वर्गातिल बागेत !
***

Like an autumn tree, when the mind
Stands denuded and empty,
Of all its fluttering leaves
Of desires and dreams it becomes ready
To receive the celestial showers.

हा वृक्ष जसा शिशिरात गाळतो पाने
संपूर्ण रिकामे व्हावे तसे मनाने
ही पूर्वतयारी बहरासाठी असते
ज्ञानाचे दालन अशाच वेळी खुलते !
***

We daily sweep the dust
To keep the outer clean
But what about internal dirt
Anger, hate, gossip and greed ?

अंगणात होते घाण, लोटली जाते
अन घरातलीही धूळ झटकली जाते
तत्परता सारी बाह्य स्वच्छतेसाठी
सुटणार कशा पण मनातल्या निरगाठी ?
***

Space is quiet
Nature is silent
Communion happens
When words are absent.

निस्तब्ध असूदे सारे अवती भवती
अन मौन पाळू दे खुशाल अवघी सृष्टी
रे स्नेहभावना स्पर्शातुनही कळते
मैत्रीचे नाते शब्दाविणही जुळते !
***

Respecting everybody’s freedom
And remaining in one’s own beingness
Is celebrating life
In its intuitive newness.

खेळू दे त्यांचे त्याना मुक्तपणाने
साजरा करावा उत्सव ज्याचा त्याने
मन, मुक्त राहुनी आतच रमते जेव्हा
आयुष्य भेटते नवेपणाने तेव्हा.
***

A hard and cold mountain crust
Harbours burning lava within
The human frame of flesh and bone
Hides a fiery spirit in him.

धगधगतो लाव्हा कठिण पर्वतामध्ये
चैतन्य उसळते तसेच देहामध्ये
अदृश्य, आतली अशी स्वयंभू शक्ती
आमूलाग्र बदले देहामधली माती !
***

Life is a long long pilgrimage
A movement from darkness towards light
Beyond the borders of thought-mind
Into the kingdom of intuitive life.

तिमिरातुन अज्ञाताच्या, तेजापाशी
या बध्द मनाच्या पल्याड, आस्तित्वाशी
पोचायाचा प्रयत्न, ते हे जगणे
हे जीवन म्हणजे केवळ प्रवास करणे !
***

When the primordial energy drive is watched
Impersonally perceived and understood
Witnessed in its entire manifestation
Without any involvement it begins to move inwards
And rise upwards.
He, who tames and channelizes
This wild primordial energy
Becomes an intuitive wise one.

दुरुनीच पाहतो जो खेळ प्रेरणांचा
अन्‍ समजुन घेतो आवेग वासनांचा
तो सहजपणाने वळवुन घेतो शक्ती
तो अंतर्ज्ञानी होतो, मिळवुन मुक्ती !
***

Beyond the mind
Deep within oneself
One carries a mysterious fire
A spark of cosmic flame

मन देहामध्ये अवघे व्यापुन असते
अस्तीत्व आपुले पल्याड त्याच्या उरते
खोलात तिथे ती आग गूढ शक्तीची
ती ठिणगी केवळ असे विश्वज्वालेची !
***

Like the dark grey clouds
Every person has the capacity
To absorb and reflect the glory
The intelligence of divine light.

दाट सावळ्या घनांप्रमाणे
प्रत्येकात क्षमता असतेच
दैवी असे ज्ञान-तेज ग्रहण करण्याची
आणि परावर्तित करण्याचीही !
***

Life is a ripple of creative energy
Life is the unfoldment of nature’s rhythm
It sustains and celebrates the creation.

ही सृष्टी सारी सृजन शक्तिची लहर
गूढातुन प्रगटे निसर्गातला सूर
सृष्टीच राखते सातत्य निर्मितीचे
अन्‍ उत्सव करते रोज नव्या सृजनाचे !
***

When separate moments and events
Culminate Into one whole experience
Time transforms into timeless
And rock-like ego
Merges into the eternal ocean
Of boundless intelligence.

क्षण आणि घटना आपलं वेगळ आस्तित्व विसरुन
एकसंघ अनुभव बनून जातात
तेव्हा क्षण कालातीत होतात
आणि पहाडासारखा अहं विरघळून जातो
शाश्वत अशा अथांग ज्ञान-सागरात !
***

When the consciousness of man
Becomes quiet, clean and transparent
Like a morning dew drop
It reflects the beauty
And the existence of creation
Of which it is an integral part.

जाणीव कोवळ्या दवाप्रमाणे होते
अन्‍ नितळपणाने सारे जाणुन घेते
तिज होतो तेव्हा सौंदर्याचा बोध
ती अंश जिचा त्या गूढ सृष्टिचा शोध !
***

Short is the life span
And far lies the gate
Hasten your steps
Before it is late

आयुष्य अपुरे तेहि किती अस्थीर
जे गाठायाचे किती दूर ते दार
जाईल संपुनी बघता बघता खेळ
रे उचल पाउला नको घालवू वेळ !
***



1 comment: